संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडावे – महेंद्र ब्राम्हणवाडे

गडचिरोली  प्रतिनिधी

गडचिरोली,दि.२४/०२/२०२३

चामोर्शी माल येथे सल्लागागरा चे लोकार्पण

धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृती चे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. ते आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल. येथील आदिवासी समाजाचा प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा च्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.newsjagar

कार्यक्रमाला उदघाट्क म्हुणुन माजी आमदार आनंदराव गेडाम, मुख्य अतिथी म्हणून आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस नेते शंकरराव सालोटकर, दिलीप घोडाम, से. नि. पोलीस निरीक्षक मडावी साहेब, काँग्रेस कार्यकर्ते विश्वेश्वर दरो, नीलकंठ गोहने आणि मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते.