चामोर्शी शहर प्रतिनिधी ,न्यूज जागर
चामोर्शी,दि.२४/०२/२०२३
समाज हिताचे काम सविधनानुसार केल्यास समाजाला न्याय देता येईल त्यासाठी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून. “सबका साथ, सबका विकास” या धोरणानुसार सहकार्याच्या भावनेतून समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार डॉ देवराव होळी यांनी केले
आज सन २०२२.२३ ची वार्षिक आमसभा २३ फरवरी रोजी पंचायत समिती प्रांगणात आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षेखालील घेण्यात यावेळी त्यावेळी ते बोलत होते मंचावर तहसीलदार संजय नागटिळक, पंचायत समिती गटविकास अधिकारी सागर पाटील, सहा. गटविकास अधिकारी व्हंनखंडे, नगर पंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, माजी सभापती भाऊराव डोरलिकर, माजी उपसभापती आकुली बिस्वास, उपसभापती वंदनाताई गौरकर, माजी प. स सदस्य संगीता भोयर, प्रं. सो. गुंडावार , महामंत्री मधुकर भांडेकर, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पप्पी पठाण, अमित यासलवार, उपस्थित होते MLA.DR.HOLI
सर्व प्रथम पाहुण्याचे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या मुलींनी स्वागत गीतांनी स्वागत केले नंतर संविधानाचे वाचन करण्यात आल्यावर प्रास्ताविक पंचायत समिती गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनाविषय विस्तृत माहिती दिली.
यावेळी १३ मे २०२२ रोजीच्या वार्षिक आमसभेतील अनुपालन अहवाल वाचन सांखिकी विस्तार अधिकारी नितीन पेंदोर यांनी केल्यावर त्यातील प्रश्न व त्याचे अनुपालनवर चर्चा करताना सगणापुर घरकुल, दहेगाव येथील जिल्हा परिषद शाळा वॉलकंपाऊंड व चाकलपेट पाणी पुरवठा योजना, आमगाव महाल ग्रामपंचायत सभा यासह अनेक प्रलंबित प्रश्ना बाबत दिलीप चलाख, मधुकर भांडेकर, सुभाष कोठारे यांनी तर लखमापूर बोरी येथील आरोग्य केंद्र वीजपुरवठा आदीबाबत भाग्यवान पिपरे यांनी , पंचायत समिती शापिंग गाळे हे मूळ मालकांनी दुसऱ्याला गाळे किरायानी दिले हा प्रश्न साईनाथ बुरांडे यांनी उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली, माणिक तुरे यांनी क्रिंडगण, बसस्थानक , मुत्रिघर आदी प्रश्न उपस्थित केले तर. हळदवाही येथील अपंग लाभार्थ्यांना मंजूर घरकुल असून वादामुळे घरकुल झाले नाही तालुक्यातील महसुली गावाचा ही प्रश्न उपस्थित करण्यात आला ते प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश सभाध्याक्षानी दिले