डॉ.सुकेशिनी बोरकर (बन्सोड) यांच्या ’नाती काव्यसुमनांची’ कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर 

कोरची,दि.२८/०२/२०२३

अविष्कार साहित्य मंच’ ब्रह्मपुरी च्या विशेष एक दिवसीय साहित्य संमेलनात डॉ. सुकेशिनी बोरकर (बन्सोड) यांचा ’नाती काव्यसुमनांची’ हा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आले.newsjagar

यावेळी मंचावर उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. शाम झाडे लोकमान्य टिळक विद्यालय ब्रह्मपुरी यांच्या शुभ हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.धनराज खानोरकर सर ने. हि. महाविद्यालय ब्रह्मपुरी तसेच प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर गोविंदराव मुनघाटे कॉलेज, कुरखेडा प्रा. डॉ. विजय रेवतकर महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी व स्वागताध्यक्ष म्हणून मा. अशोकभाऊ रामटेके, सचिव पंचशील एज्युकेशन सोसायटी, ब्रह्मपुरी उपस्थित होते. त्यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. आपले संपूर्ण श्रेय त्यांनी ज्येष्ठ कवी उत्तमजी बगमारे व आंबेडकरी चळवळीचे कवी व अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी व  कुटुंबीयांना दिले आहे.