यशोधरा विद्यालयात विज्ञान दिन संपन्न

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

चामोर्शी ,दि.२८/०२/२०२३

यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शाम रामटेके , विशेष अतिथी म्हणून सक्सेस अकॅडमी चे संचालक स्वप्नील गुजलवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणूनकुसुम सावसाकडे , प्रकाश बारसागडे , प्रवीण नैताम, साजेदा कुरेशी, सरिता वैद्य, जयश्री कोठारे होते.

newsjagar
या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांनी वैज्ञानिकाच्या जीवनावर प्रकाश टाकला. आणि समाजातील अंधश्रद्धा , अनिष्ठ रुढी परंपरा नाकारून स्वतः सोबतच समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवावा , असे आवाहनही केले . प्रास्ताविक राजू धोडरे , यांनी केले, संचालन दुर्गा मंडरे तर आभार सह्याद्री लटारे यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर भोयर, रुपलता शेंडे व लक्ष्मण गव्हारे यांनी सहकार्य केले.