महा मॅरेथॉन स्पर्धेत मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला पुरस्कार

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,दि.

दि. 5 मार्च 2023 ला गडचिरोली पोलीस दलातर्फे आदिवासींच्या सन्मानार्थ आयोजित “गडचिरोली महा-मॅरेथॉन २०२३” स्पर्धेत शीर्षक प्रायोजक मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज देसाईगंज (वडसा) या कंपनीला कौतुक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मायश्री ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक आकाश अग्रवाल व रोहित अग्रवाल यांनी स्विकारला. यावेळी आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) मुंबई प्रवीणजी साळुंखे, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्ह्या पोलीस अधीक्षक निलोत्पलजी, मा. जिल्हाधिकारी यांचे सह पोलीस विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.newsjagar