कोरची येथील सर्वे नंबर 601 मधील 25 अतिक्रमण केलेल्या पैकी 8 जनांवरच कार्यवाही का ? – अतिक्रमण धारकांचा प्रश्न.

Korchi-weekly-market-encroachment

श्री.नंदकिशोर वैरागडे विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा, न्यूज जागर 

कोरची,दि.०८/०३/२०२३

कोरची येथील बाजार चौकातील अतिक्रमण 3 मार्च ला काढण्यात आले. या सर्वे नंबर मध्ये एकुण 25 लोकांनी अतिक्रमण केले आहेत .त्यापैकी 8 जनांचे अतिक्रमण काढण्यात आले. उर्वरित 17 लोकांचे अतिक्रमण का काढण्यात आले नाही ? असा प्रश्न ज्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केले आहेत. Encroachment at korchi weekly market 

येथील सर्वे क्रमांक 601 मध्ये 3.67 हे. आर जागा म्हणजे 9 एकर पेक्षा जास्त जागा असून आठवडी बाजाराकरीता राखून ठेवण्यात आली आहे.याच जागेवर बाजार संकुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या जागेच्या सभोवती व्यापारी लोकांचे अतिक्रमण आहे.
पैकी 8 अतिक्रमण धारकांनी 6 मार्चला सायंकाळी येथील हनुमान मंदिरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासह हजर होते. आमच्या कुटूंबाचे उदरनिर्वाह या ठिकाणी लहान सहान दुकाने टाकून करीत आहोत. आमची दुकाने हटविण्याल्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आमचा विरोध अतिक्रमण काढण्यावर नाही. सर्वे नंबर 601 मध्ये 25 लोकांचे अतिक्रमण आहे. हे संपूर्ण अतिक्रमण काढून बाजार संकुलाचे बांधकाम करायला पाहिजे होते. परंतु असे नगरपंचायत ने केले नाही.असे त्यांचे म्हणणे आहे. newsjagar

यावेळी आसाराम सांडिल, गुरुदेव मेश्राम, जोहन हिरवाणी, माखन बंजार, राजेन मेश्राम, दिगांबर पडोटी, झाळूराम मेश्राम, शांताबाई सहारे, ईश्वर साखरे, चेतन मेश्राम, चंद्रशेखर सांडील, शुभम मेश्राम, विनायक सलामे, दामूजी कुंभारे, संगिता मेश्राम, आशा मेश्राम, पल्लवी मेश्राम, भुनेश्वरी बंजार, संगिता हिरवानी, शांताबाई सांडील ईत्यादी उपस्थित होते.