राज्य राखीव पोलिस दल गटाचा ७५ वा वर्धापन दिन थाटात साजरा

The-75th-anniversary-of-the-State-Reserve-Police-Force-was-celebrated-in-grand-style

श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज,दि.०८/०३/२०२३

सहाय्यक समादेशक दशरथ जांभुळकर यांच्या माग॔दश॔नात विविध कार्यक्रमांचे आयोजन

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विसोरा नजीकच्या राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक-१३ चा ७५ वा वर्धापन दिन सहाय्यक समादेशक दशरथ जांभुळकर यांच्या माग॔दश॔नात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून थाटात साजरा करण्यात आला. The 75th anniversary of the State Reserve Police Force was celebrated in grand style
वर्धापन दिनाच्या निमित्ताने विसोरा येथील महिलांचे संगीत खुर्ची व लहान मुलांचे निंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली. विसोरा, तमाशी, एकलपुर,शंकरपुर इत्यादी गावातील क्रिकेट व व्हाॅलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.चोप कोरेगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व देसाईगंज येथील किदवाई प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची निंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली तसेच त्यांना शस्ञ प्रदर्शनी,वन मिनिट ड्रिल व कवायतीचे प्रदर्शन दाखविण्यात आले.
दरम्यान दत्तक गाव तमाशी येथे स्वच्छता मोहीम व गावकऱ्यांना व्यसनमुक्ती व्याख्यान देण्यात आले. विसोरा गावात बँड डिस्प्लेचे आयोजन करण्यात आले. राज्य राखीव पोलिस दलाच्या ७५ व्या वर्धापन दिना निमित्त मुख्यालयात आयोजीत हर्ष कवायत संभारंभा करीता वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल,बल्लारपुरचे क्षेञ प्रबंधक सभ्यासाची डे,पोलिस अधिकारी,अंमलदार तसेच पोद्दार इंग्रजी शाळेचे प्राचार्य, विसोऱ्याचे सरपंच रमेश कुथे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.newsjagar
कवायतीचे संचालन मुख्यालय पोलिस निरीक्षक एस.एन.गाडेकर यांनी केले. कवायत करीता पो.नि.पि. डी.एकोणकर,पोलिस उपनिरीक्षक एन.आर.फणसे व प्लाटुन नायक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक के.एस. ननीर व निशान टोली प्रमुख पो.उपनिरीक्षक सि.एच. धनविज यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करून पोलिस अंमलदार यांना गडचिरोली नक्षलग्रस्त भागात विशेष सेवा केल्याबद्दल खडतर सेवा पदक तसेच पोलिस बलाचे स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वर्धापन दिन थाटात साजरा करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.