श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी ,दि.०९/०२/२०२३
♦ निवडणुकीसाठी ३४ उमेदवार कायम
आगामी होऊ घातलेल्या येथील सेवा सहकारी संस्था निवडणुकीत सहा उमेदवार मागे घेतले असून ३४ उमेदवार निवडणुकीत कायम आहेत
१९ मार्च रोजी होऊ घातलेल्या सेवा सहकारी संस्था निवडणुकीसाठी अतुल गण्यारपवार , माणिक कोहळे व आशिष पिपरे गटाकडून सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गट, व इतर मागास प्रवर्ग गटासाठी ऐकून ४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते . त्यापैकी ०८ मार्च रोजी सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातून
निशांत नैताम, अतुल गण्यारपवार, प्रदीप भांडेकर, काशिनाथ लटारे, विनोद चलाख हे पाच तर इतर मागास प्रवर्ग गटातून निशांत नैताम असे ऐकून ०६ उमेदवार आर्ज मागे घेतले असून ३४ उमेदवार निवडणुकीस कायम आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एल. एस. रंधये यांनी दिलीअसून तीन पॅनल मध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याची खमंग चर्चा शहरात होत असल्याने यात अनेक दिगजाची कसोटी पणाला लागणार आहे त्यामुळें शहरात राजकीय वातावरण गरम होत असल्याचे चित्र दिसून येतआहे.newsjagar