गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातच, मात्र राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे अजूनही रेल्वे मार्गापासून वंचीत

दिनांक २१/३/२०२३ मुंबई

रेल्वेच्या प्रतीक्षेत जिल्हावासीय

विधानसभेत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली मागणी

 

गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातच असून अजून पर्यंत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे रेल्वे मार्गाचा विकास झाला त्याप्रमाणे झाला नाही. गडचिरोली जिल्हा हा रेल्वे पासून वंचित असून केवळ वडसा वगळता जिल्ह्यात अन्य कुठेही रेल्वे नाही .त्यामुळे हा जिल्हा विकासापासून वंचित राहिलेला आहे. गडचिरोलीतील जिल्हावासीय रेल्वेच्या प्रतीक्षेत असून मागील अनेक वर्षापासून आज उद्या आपल्या जिल्ह्यात रेल्वे येईल या आशेवर आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचा मार्ग रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी यांनी आज विधानसभेत लक्षवेधी वरील चर्चेत केली.newsjagar