श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
चामोर्शी,दि.२५.०३.२०२३
चामोर्शी होम मिनिटर ठरल्या मिनल तोडसाम
नगर पंचायत च्या वतीने काल दि . २४ मार्च रोजी सांयकाळी ७ वाजता बाजार चौक नगरपचायंत समोरील पटांगणात गुढीपाडवा निमित्य महाराष्ट्रातील महिला भगिनीचा आवडता एकमेव कार्यक्रम न्यु होम मिनिटर खेळ पैठणीचा सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बाल गायिका टिव्ही स्टार सहयाद्री मळेगावकर यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेऊन चामोर्शी येथे महिलाचे खेळ घेऊन महिलाची मने जिकली .NewsJagar
यावेळी कार्यक्रमाला नगराध्यक्ष जयश्री वायलालवार , उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , बाधकाम सभापती वैभव भिवापूरे , पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम , महिला व बाल कल्याण सभापती गिता सोरते , उपसभापती स्नेहा सातपुते , नगरसेवक सुमेध तुरे , आशिष पिपरे , नगरसेविका प्रेमा आईचवार, सोनाली पिपरे , वर्षा भिवापुरे , काजल नैताम , रोशनी वरघंटे , वंदना गेडाम ,अभियंता निखिल कारेकर , शहरातील प्रतिष्ठित नागरिक व न प . कर्मचारी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
खेळ पैठणीचे विनर – प्रथम बक्षिस – सात हजार रुपयांची पैठणी – चिराग ट्रेडर्स मनेश गाधी , व १.५ ग्रॅमची नथ के . रविशंकर ज्वेलर्स रविशंकर खरवडे याचे कडून चामोर्शी होम मिनिटर ठरलेल्या मिनल तोडसाम यांना मिळाले .
तर द्वितीय बक्षिस – पाच हजार रुपयांची पैठणी परिवार फॅशन प्लाझा स्वप्नील वरघंटीवार व १ ग्रॅम सोन्याची नथ दत्त ज्वेलर्स दत्तात्रय चेली यालवार यांचे कडून – नम्रता मार्तीवार यांना मिळाले ,
तृतीय बक्षिस तीन हजार रुपयाची पैठणी संतोष वस्त्र भंडार संतोष गुडेलीवार व १ चांदीचा छल्ला न्यु कल्याणी ज्वेलर्स गौरव चिमड्यालवार यांचे कडून – मृणाल तुम्पलीवार यांना मिळाले ,
चौथे बक्षिस – हॅन्ड मिक्सर श्री व्यंकटेश स्टिल अॅन्ड फर्निचर राकेश भिमनवार यांचे कडून- पुनम सातपुते यांना मिळाले ,
पाचवे बक्षिस- डिनर सेट बालाजी इन्टरप्राईजेस शेखर जिल्हेवार यांचे कडून – भारती चलाख यांना मिळाले ,तर सह ते दहा पर्यन्तचे बक्षीस १० ग्रॅम चांदीचे सिक्के – मनेश गांधी पेट्रो सर्व्हो यांचे तर्फे देण्यात आले. .
प्रोत्साहनपर बक्षिस माँ दुर्गा ग्राफिक्स तर्फे रोशन वडेट्टीवार यांचे कडून ११ हजार रुपयाचे बक्षिस , तर लकी लेडी – कल्पना बहिरेवार यांना सभापती गिता सोरते व उपसभापती स्नेहा सातपूते यांचे कडून साडी गिप्ट देण्यान आले .
तर प्रश्नमंजुषा मध्ये – नगर सेविका काजल नैताम ६ गिप्ट ,रोशनी वरघंटे ६ गिप्ट, प्रेमा आईचवार ६ गिप्ट तर नगरसेविका माधूरी व्याहाडकर 3 गिप्ट , वंदना गेडाम ३ बक्षिस सहभागी महिलाना देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार राकेश खेवले सर यांनी पार पाडले . या कार्यक्रमासाठी महिलांची अफाट गर्दी होती . नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अर्थक परिश्रम घेतले .
कृपया बातमी कॉपी करू नका । शेअर करा, धन्यवाद !