श्री.विलास ढोरे वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर
देसाईगंज,दि.२९/०३/२०२३
मानवी जीवनात सुख.. दुःख असल्यामुळे आशा निराशेचे माहेरघर बनलेले असते. अशा विचारांना खतपाणी घालते तेंव्हा श्रद्धेचा जन्म होतो,तर निराशा मनाला लागलेला घोर ताप होय.निराशा ही अनुचित कार्याला जन्म देते .विधीच्या विनाशात अंधश्रद्धेची बीजे असतात. तिथे पराजय निश्चित असतो. श्रद्धा जीवनात चैतन्य निर्माण करते व चाकोरी बद्ध जीवन जगण्यासाठी भाग पडते. श्रीमद भागवत श्रावणाने मनुष्याचे जीवन बदलते त्याला शाश्वत आनंद मिळतो श्रीमद भागवत हे केवळ ग्रंथा पुरते मर्यादित नसून त्या तील एक एक कथा ही मनुष्याच्या जीवनातील सूत्रा प्रमाणे आहे, ज्ञान हे पैश्या पेक्षा श्रेष्ठ आहे कारण ज्ञान हे आपले रक्षण करीत असतो , आनंद आणि गोविंद हे दोन्ही एकच शब्द आहे कारण जेव्हा आपण आनंद शोधण्यासाठी जातो तेव्हा आपणास गोविंद मिळतो आणी जेंव्हा आपण गोविंद शोधण्यासाठी जातो तेव्हा आपणांस आनंद मिळतो, श्रीमद भागवत ग्रंथ हा सर्व श्रेष्ठ ग्रंथ आहे श्रीमद भागवताचा विस्तार हा खुप मोठा आहे,संकटे ही मनुष्याच्या जीवनात आलीच पाहिजे कारण ती नुसती संकटे नसून ती एक परिक्षा च असते अशा वेळेस आपले कोण आणि परके कोण हे आपणांस समजून येते. असे प्रतिपादन हरी भक्त पारायण देवानंद पिलारे महाराजांनी आपल्या भागवत सप्ताहात व्यक्त केले. देसाईगंज येथील साई बाबा मंदिर हनुमान वार्ड येथे रामनवमी निमित्ताने भागवत साप्ताहा चे आयोजन करण्यात आले आहे, त्या निमित्ताने प्रवचन करतांना ते बोलत होते. राम अवतारा नंतर कंस, चा नूर ,मुस्टिक, अद्रक, केशी, प्रलंभ,शिशुपाल, वक्रदंत, जरासंघ या दैत्य रुपी प्रवृत्ति नी जन्म घेतला आणि सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले. पृथ्वी ने गाई चे रूप धारण करून क्षीर सागरी शेषावर पडलेल्या नारायनास पृथ्वी रक्षणाची विनंती केली तेंव्हा गाय गो माता बनली त्यामुळे गो हत्या करण्याचे पातक करू नका , तिचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करा असे मार्गदर्शन हरी भक पारायण देवानंद पिलारे महाराज यांनी केले. भागवत सप्ताह यशस्वी पणे पार पाडण्यासाठी साई बाबा मंदिर सेवा समिती, श्री संप्रदाय सेवा समिती , महालक्ष्मी महिला मंडळाच्या सर्व कार्य कर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. हनुमान वार्ड तथा देसाईगंज शहरातील भाविक मंडळी या भागवत सप्ताहाचा यथोचित लाभ घेत आहेत .