गडचिरोली शहर प्रतिनिधी,न्युज जागर
गडचिरोली,दि. ०६/०४/२०२३
गडचिरोली शहर तसेच ग्रामीण भागात घरपोच सिलिंडर पोहचवून देण्याचे जास्तीचे पैसे घेतले जातातआहेत असे आढळून आले आहे , वास्तविक घरपोच सिलेंडर पोहचवून देण्याचे काम यांचे असताना सुद्धा एका सिलेंडर ग्राहकाकडून 30 ते 50 Rs रूपये जास्तीचे उकळले जात आहेत, शहरी आणि ग्रामीण भागात 100,150 Rs जास्तीचे घेतले जातात, पावती मागितल्यास ती दिली जात नाही, नागरिकांकडून अधिकचे पैसे मागितले जात आहेत, आधीच सामान्य माणूस आर्थिक ओझ्याखाली दबलेला असून आता पुन्हा या सिलेंडर पोहोचविण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे, जिल्ह्यातील व शहरातील संपूर्ण गॅस एजन्सीची सखोल चौकशी करून नागरिकांकडून जास्तीचे पैसे घेणे बंद न झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण गॅस एजन्सीला येत्या आठवडा भरात ताले ठोकू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके यांनी दिला आहे.