श्री.भुवन भोंदे.प्रतिनिधी,वडसा
देसाईगंज,दि.१२/०५/२०२३
बदलत्या ऋतुमानानुसार व खाद्यपदार्थात वापरण्यात येणारे रासायनिक औषधांमुळे मानवी जिवनात अनेक रोग उद्भवत असून एक्युप्रेशर नेचुरल थेरेपी चिकित्सा रूग्णांना फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन प्रथम फॅशन मॉलचे संचालक तथा माजी नगरसेवक हरिश मोटवाणी यांनी केले.देसाईगंज येथील कुथे पाटील कॉन्व्हेंट व ज्युनिअर कॉलेज देसाईगंज यांच्या वतीने आयोजित एक्युप्रेशर, सुजोक, वाइब्रेशन, नेचुरल थेरेपी चिकित्सा शिबीरचे उद्घाटना प्रसंगी मोटवाणी केले आहे. सदर शिबीरचे फित कापुन उद्घाटन हरिश मोटवाणी यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या स्थितीत विविध आजार असलेले रुग्ण ठिकठिकाणी उपचार करतांना दिसतात मात्र त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांच्या समस्या वाढतात अश्यात एक्युप्रेशर नेचुरल थेरेपी चिकित्सा पद्धती आज घडीला उपयुक्त ठरत असल्याचेही मोटवाणी यांनी सांगितले.सदर शिबीर दि. ११ मे २०२३ ते १५ मे २०२३ पर्यंत स्थानिक कुथे पाटील कॉन्व्हेंट शिवाजी वार्ड देसाईगंज येथे सकाळी ७.३० ते दु. १२.०० व सायं. ४.३० ते रात्री ८.०० वाजे पर्यंत चालणार आहे. शिबीरात एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग ट्रिटमेंट संस्थान जोधपुर / राजस्थान चे तज्ञ थेरपिस्ट मुकेश चौधरी व गुरूप्रीत सिंह हे उपचार करणार आहेत. शिबीरात रजिस्ट्रेशन फि १०० रू. भरावी लागणार असून यात उपचार मोफत होणार आहेत. अधिक माहिती करीता श्रीमती निलोफर शेख भ्रमणध्वनी क्र. ७६२०८१४२२३, प्राचार्य डॉ. मंगेश भावे २८९००७४८९४, मुख्याध्यापक रामदास वंजारी ९४२३४२३०४३, लिपीक दिलीप राऊत ९१५६२८७२१६ आदींशी संपर्क साधू शकता.