भगवान महादेव मार्कंडेश्वराचे मंदिर लवकरच पूर्ण होणार – आमदार डॉक्टर देवरावजी होळी

markanda-mandir

चामोर्शी तालुका प्रतिनिधी ,न्यूज जागर

दिनांक १५ मे २०२३ मार्कंडा

१०० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच जलाभिषेकाने महादेवाची पिंड पूर्ण भरल्याने भक्तांमध्ये आनंद

मार्कंडा देवस्थान येथे जलाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडा देवस्थान येथील मार्कंडेश्वराचे मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता हिंदू रितीरिवाजा नुसार धार्मिक विधी करण्याचा संकल्प केला. ११ दिवसाच्या भगवान महादेवाच्या जागृती अनुष्ठानंतर आज जलाभिषेकाचा कार्यक्रम मार्कंडा देवस्थान येथे आयोजित केला असता १०० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच महादेवाची पिंड जलाभिषेकाने पूर्ण भरल्याने लवकरच मार्कंडेश्वराचे मंदिर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

मार्कंडा देवस्थान येथे १०० वर्षाच्या कालावधीमध्ये यापूर्वी ३ वेळा गावकऱ्यांनी भगवान महादेवा मार्कंडेश्वराच्या जलाभिषेकाचा प्रयत्न केला. मात्र पूर्ण पिंड या तीनही प्रयत्न मध्ये भरली गेली नाही. यावेळी ११ दिवसांच्या महादेवाच्या जागृती अनुष्ठानंतर केलेल्या जलाभिषेकात २ तासांमध्येच भगवान महादेवाची पिंड जलाभिषेकाने पूर्णपणे भरल्याने भक्तांमध्ये प्रचंड आनंद दिसून आला. आता खरोखर लवकर मंदिराचे काम पूर्णत्वास येईल असा विश्वास भक्तांनी यावेळी व्यक्त केला.