-
चामोर्शी:–भारतीय स्वातंत्र्याच्या अम्रुत महोत्सवा निमित्त स्थानिक जा क्रु बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात व्रुक्षारोपण व स्वच्छता अभियान कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा- सौ. छायाताई रविशंकर बोमनवार प्रमुख अतिथी – सहसचिव- निकेश गद्देवार, संस्था सदस्य- अभिषेक बोमनवार, नम्रता बोमनवार, प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर, प्राध्या. – नमुदेव कापगते आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या पटांगणात व्रुक्षारोपण करण्यात आले.
अतिथीनी व्रुक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणामांची माहिती दिली. दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग मुळे प्रूथ्वीचे तापमान वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. यामुळे प्रत्येकाने व्रुक्षारोपण करून व्रूक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी व्रुक्षारोपण करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन केले.
संचालन- प्राध्या- खुशाल कापगते तर आभार प्रदर्शन- स. शि. महेंद्र किरमे यांनी केले. याप्रसंगी प्राध्या, शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी ,विदयार्थी उपस्थित होते.
क्ष