चामोर्शी तालुका प्रतिनिधी
तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायतीच्या विद्यमाने स्वतंत्र्याच्या अम्रुत महोत्सवा अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या विविध स्पर्धेत जा क्रु बोमनवार विद्यालय च्या विदयार्थ्यांनी सुयश मिळविले आहे.
निबंध स्पर्धेत-कु. आचल सातपुते वर्ग १२ वा विज्ञान हिने प्रथम क्रमांक पटकावला.
वक्त्रुत्व स्पर्धेत:-कु. प्राजक्ता सातपुते वर्ग १२ वा विज्ञान हिने प्रथम क्रमांक तर कु. स्वरुपा गव्हारे, वर्ग १२वा विज्ञान हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
चित्रकला स्पर्धेत:- कु. राहेल येलमुले वर्ग ११ वा विज्ञान हिने प्रथम क्रमांक पटकावला.
बेस्ट फार्म वेस्ट (राखी बनविने) या स्पर्धेत:- टिना कुमरे वर्ग ११ वा विज्ञान व्दितीय क्रमांक पटकावला.
देशभक्ती समुहन्रुत्य स्पर्धेत– वर्ग ८ ते १० गटातून कु. सुरेश साबळे व संचानी प्रथम क्रमांक पटकावला.
वर्ग ११ ते १२ गटातून पोरस चांदेकर व संच यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.
सेल्फी विथ तिरंगा – यात स. शि. सौ. कविता बंडावार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
नगरपंचायत भवनात घेण्यात आलेल्या बक्षिस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्षा- छायाताई रविशंकर बोमनवार, उपाध्यक्ष- प्र. सो. गुंडावार गुरूजी, सचिव – श्री . – रविशंकर जागोबाजी बोमनवार, संस्थासदस्य-अभिषेक बोमनवार, सौ. नम्रता बोमनवार, प्र. प्राचार्य- इतेंद्र चांदेकर, प्राध्या- नमुदेव कापगते, प्राध्यापक शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.