स्वाब संस्थेच्या सदस्यांनी चित्तेरी जंगल घुबडाला (Mottled wood owl) दिले जीवनदान

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
.
तलोधी बा.
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तळोधी बीटातील, सावरगाव येथील नाटककार रुपचंदजी निकुरे यांच्या घर परिसरात अशक्त अवस्थेत असलेल्या एका चित्तेरी जंगली घुबड (Mottled wood owl) च्या मागे कावळे लागल्याने व उडण्यास असमर्थ असलेल्या घुबडा बद्दल ‘स्वाब’ संस्था चे अध्यक्ष कायरकर माहिती कळविण्यात आली. त्यानंतर त्यांनी तळोधीचे वनरक्षक एस. बी. पेंदाम त्यांना माहिती देऊन, त्यांच्या समक्ष त्या घुबडाला रेस्क्यू करून नंतर त्याला काही वेळाने एका सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान देण्यात आले.
यावेळी वन विभागाचे वनरक्षक एस.बी. पेंदाम संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य /सर्पमित्र महेश बोरकर हे घुबडाला सुरक्षित ठिकाणी सोडते वेळेस उपस्थित होते.
नेहमी जख्मी किंवा संकटात सापडलेल्या साप,बंदर, कोणत्याही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धरपडनार्या अग्रेसर असलेल्या ‘स्वाब नेचर केअर संस्था’ च्या सदस्यांनी या पावसाळ्यातील याच परिक्षेत्रातील तलावातील मच्छीमाराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाळ्यात अडकलेल्या एकुण 10 दहा अजगरांना, 2 दोन अपघातात जख्मी वानरांना,1 एक ऊदमांजर, 2 दोन घोरपडी व इतर नाग,घोणस,मन्यार, अशा विषारी व धामन, तस्कर, रसेल कुकरी, कवळ्या, रुका सारख्या बिनविषारी अशा विविध 100 पेक्षा जास्त सापांना ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य/ सर्पमित्र जीवेश सयाम, महेश बोरकर, यश कायरकर, हितेश मुंगमोडे, वेदप्रकाश मेश्राम, यांनी या वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या साप, प्राणी यांची वनविभागात नोंद करून त्यांना सुरक्षित सोडून जीवदान दिलेले आहे.