ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने पोलीस. निरिक्षक याना समस्याचे यांना निवेदन

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी,दि.१५/०२/२०२३

येथील तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांची भेट घेऊन समस्याचे निवेदन दिले.
नगरात मागील काही दिवसापासून घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले आहे .chmorshi police  नुकतेच हनुमान नगरातील रहिवाशी राजू वैद्य नायब तहसीलदार याचे घरी चोरट्यांनी घरफोडी केली तर यापूर्वीही काही ठिकाणी शहरात घरफोडी झाली आहे या वाढत्या घरफोडीला आळा घालण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढविन्यात यावी. तसेच  मार्कंडा  जत्रेत ज्येष्ठ नागरिकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी वेगळ्या लाईनची व्यवस्था करावी हया मागण्याचे निवेदन पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना देण्यात आले. तालुका अध्यक्ष विजय कोमेरवार, सचिव सत्यवान वाळके , सल्लागार गुंडावार गुरुजी, मोरेश्वर चलकलवार, बबनराव वडेट्टीवार, उपस्थीत होते. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितली की, शहरातरात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्यात आली असून मार्कडा यात्रेत ज्येष्ठ नागरिकाना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी वेगळी सोय उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. newsjagar