गडचिरोली
श्री. उमेश उईके , उपसंपादक , न्यूज जागर
गडचिरोली तालुक्यातील नवेगाव येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्ताने ” हर घर तिरंगा, हर घर संविधान.” अभियान राबविण्यात आला. या अभियाना अंर्तगत परिसरातील नागरिकांना तिरंगा झेंड्या सोबतच संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळेस राष्ट्र सेवा दला तर्फे तिरंगा झेंडा व संविधान प्रास्तविकाचे वाटप करण्यात आले. सदर अभियान यशस्वी करण्याकरिता राष्ट्र सेवा दलाचे पुर्ण वेळ कार्यकर्ता उमेश ऊईके, माजी सेवा दल मंडळ सदस्या सारिका मोगरे ( ऊईके ), सुरज डोईजड, पराग डोकरमारे, राजु मडावी, आकाश मडावी, प्रणय देसाई, प्रेरणा ऊईके, शिवालीका भांडेकर, केतण मिसरी आदी सदस्य उपस्थित होते.