महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

न्यूज जागर साकोली
दि.२८/११/२०२२

साकोली

आज प्रबोधिनी पतसंस्था साकोली येथे महात्मा जोतिबा फूले यांच्या पूण्यतिथी निमित्ताने जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी दिपक जांभूळकर व संस्थेचे अध्यक्ष मनोहर जी टेंभूर्णे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत वडीचार, व्यवस्थापक शानदेवजी धरत, लिपिक पकंज राऊत, राऊत मँडम, अभिकर्ता ईरलेजी, सविता बडवाईक, सागिर शेख इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.