भेजगाव येथे 3 जानेवारीला निशुल्क मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर
सक्षम संस्थेचा पुढाकार
मूल : तालुक्यातील भेजगाव येथे समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून निशुल्क मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन भेजगाव येथील ग्रामपंचायत पटांगणावर करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी रुग्णांना मोफत तपासणी व सल्ला मार्गदर्शन केले जाणार आहे. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची ने आण राहण्याची जेवणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.
या शिबिराला मूल तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी उपस्थित राहून तपासणी करावी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजक सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गणवीर यांनी केले आहे.