प्रेस नोट
देवनिल विद्यालय टेकाडी येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
…………………………………………………..
विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळुन सर्वांगिण विकास व्हावा यादृष्टीने क्रीडा व सांस्कृतिक संमेलन आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनील गेडाम हे तर विशेष अतिथी पालक रविंद्र चौधरी, माजी विद्यार्थी मंगेश पोटवार, प्रविण गोहणे,शरद गणवीर,दीपक वाकडे, विनोद गोहणे, प्रमोद भोयर, अमोल करपे,ओमदेव मोहुर्ले, लखन भोयर,आकाश गुरनुले, महेंद्र शेंडे,विलास जक्कुलवार,श्रीकृष्ण पोटवार, वैशाली कुंभमवार, माधुरी मोहुर्ले, प्रिती मस्कावार ,सचिन कोल्हटवार ,रीतेश पिजदुरकर, श्रेयस रामटेके आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून अनुभव कथन करताना यशस्वी जीवनासाठी शिक्षणा बरोबरच ध्येय निश्चित करुन त्या दृष्टीने कठोर परिश्रमाची गरज आहे असे मत व्यक्त केले .मार्गदर्शन करताना सुनील गेडाम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे महत्त्व विशद केले तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी आज वेगाने बदल होत चाललेल्या परीवर्तनशील तंत्रयुगात आजी माजी विद्यार्थी संवाद अधिक आवश्यक आणि प्रेरणादायी असुन विद्यालयाचे नावलौकिक करण्यात माजी विद्यार्थांचे योगदान खुप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
माजी विद्यार्थी मेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलन सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धा,वर्ग सजावट, रांगोळी स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा, इत्यादींचे आयोजन करण्यात आले.यात सर्वच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आंतरवर्गीय विविध क्रीडा स्पर्धेत वर्ग ७ वा आणि वर्ग १० वा यांनी अव्वल स्थान कायम राखले तर सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग ९वी आणि १०वी तील सादागड येथील विद्यार्थ्यींनींनी विशेष प्राविण्य मिळविले.विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक नामदेव पिजदुरकर यांनी केले. सुत्र संचालन संदीप धाबेकर तर आभारप्रदर्शन वैशाली भांडेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक अंबादास राजनकर, गणेश श्रीरामे, मनोहर मडावी, सुशिला उडाण, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, विनोद हंगाम, आत्माराम सुरजागडे, सचिन कोल्हटवार, सुयोग वसाके,प्रवज्जा रामटेके, शाळा मंत्रीमंडळ, स्काऊट गाईड मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.