चांदापूर हेटी येथे बालिकादिन व पालक मेळावा संपन्न
मुल प्रतिनिधी
आज दिनांक ३ जानेवारी २०२५ रोज शुक्रवारला जिल्हा परिषद प्राथ. शाळा चांदापूर हेटी येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या , आदयशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त बालिकादिन व माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मंगलाताई चिंचेकार, अध्यक्ष लोमेश तिवाडे, प्रमुख पाहुणे उमेश नगरकर, रुपेश तिवाडे, वैशालीताई कलगटवार, शिलाताई तिवाडे, शोभाताई वरगंटीवार, वर्षाताई पाल, मुख्याध्यापक दिलीप भुरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीतगायन, भाषण स्पर्धा, चमचा गोळी, संगीत खुर्ची अशा स्पर्धा घेण्यात आल्या .
त्याचप्रमाणे परिचारीका निलिमा अवतरे, आरोग्य सेवक तुषार उईनवार , सुपरवायझर प्रिती रत्नावार, आशावर्कर वनिता मर्लेवार, आशावर्कर विद्या पोटे यांच्या उपस्थितीत आरोग्य विषयक मार्गदर्शन घेण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . स्वरा बट्टे हिने केले . तर प्रास्ताविक श्री. नंदकिशोर शेरकी यांनी केले. कु श्रुती चिंचेकारने मी सावित्री बोलतेयव यश चिंचेकारने मी जोतीराव फुले बोलतोय चे अभिनय सादर केले . कु शुभ्रा सेकुर्तीवार, कु रिया तिवाडे, कु नंदनी बांदुरकर, कु . वैष्णवी घोगरे व योगेश लाडवे यांनी आपली मनोगत व्यक्त केले . इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गीतांचे गायन केले.
यावेळी चांदापूर हेटी येथील बहुसंख्य माता व पालक आणि गावकरी उपस्थित होते .