महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिना निमित्त पोलिस स्टेशन सावली वतीने सध्दावना क्रिकेट स्पर्धा संपन्न पोलीस स्टेशन सावली वतीने क्रिकेट स्पर्धाचे २०२५ वर्षातही आयोजन
जितेंद्र बोरकर
सावली प्रतिनिधी
सावली तालुक्यात सध्दावना क्रिकेट 🏏 स्पर्धात सावली तालुका पञकार संघ, पोलिस स्टेशन सावली, पंचायत समिती सावली,आपदा संघ सावली,MSEB सावली संघ व इतर संघांनी सहभाग घेतला होता तसेच मागील वर्षी प्रमाणे यंदाही २०२५ वर्षात ही पंचायत समिती सावली संघ चांगल्याप्रकारे खेळाचे प्रदर्शन करुन अंतिम सामन्यात पोलिस स्टेशन सावली ह्या संघाचं पराभव करून सध्दावना चषक क्रिकेट स्पर्धा पटकाविला, तसेच यावेळी विजेता संघ व उपविजेता संघ सध्दावना क्रिकेट चषक मंचावर उपस्थित मान्यवरांचे हस्ते पंचायत समिती संघाचे खेळाडू आमिर पठाण यांना उत्कृष्ट फलंदाज तसेच उत्कृष्ट फलंदाज व मॅन ऑफ द सिरीज चंद्रशेखर गुरुनुले यांना चषक देण्यात आले, या प्रसंगी उपस्थितीत मा . प्रांजली चीरडे तहसिलदार मॅडम, या . प्रदीप पुल्लुरवार ठाणेदार साहेब,रासेकर ठाणेदार साहेब पोलिस स्टेशन पाथरी,खेळीकर साहेब सहाय्यक वनसंरक्षक, संदीप भाऊ पुण्यपकार नगरसेवक, सतिश भाऊ बोम्मावार नगरसेवक, प्रफुल्ल भाऊ वाळके नगरसेवक,उदय गडकरी पञकार,सुरज बोम्मावार पञकार, प्रविण गेडाम उपस्थित होते, ह्या सर्व सामन्यात स्कोअर पाहण्यासाठी प्रा. विजय गायकवाड,प्रीतम गेडाम नगरसेवक, धर्मश बोरकर, यांनी यशस्वीपणे काम केले, तसेच समालोचन रोशन बोरकर, पोलिस पाटील खोब्रागडे, प्रविण गेडाम यांनी केले, तर पंचाची भुमिका आकाश बरीवार व राजु बरीवार यांनी पार पाडली, सावली पोलिस स्टेशनचे कर्मचारी धीरज पिदुरकर व मोहन दासरवार यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले.




