छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य उपविभागीय कार्यालय मूल ला शिवरायांची प्रतिमा भेट
वासू डिजिटल आर्ट मूल चे संचालक सचीन वाकडे यांनी दिली भेट
मूल – रवि बरडे (तालुका प्रतिनिधी )
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या 19 फरवरीला सर्वत्र साजरी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज जयंती आउचित्य साधतं वासू डिजिटल आर्ट चे संचालक सचिन वाकडे यांनी उपविभागीय कार्यलय मूल ला छत्रपती ची प्रतिमा भेट दिली
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी, इ.स. १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या जवळ असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. ३९५ व्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचीत्य साधून वासु डिजिटल आर्ट मुल यांचे तर्फे उप विभागीय अधिकारी कार्यालय मुल ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो सप्रेम भेट देण्यात आले. या वेळेस उप विभागीय अधिकारी श्री. प्रवीण चरडे साहेब, नायब तहसिलदार श्री. ठाकरे साहेब माजी नगर परिषद मुल चेसभापती मिलिंद खोब्रागडे, वासु डिजिटल आर्ट चे संचालक सचिन वाकडे, अनिकेत बुग्गावार, प्रशिक दुर्गे, वासु, स्तव्य, स्वाक्ष , रवी बरडे , आर्यन बरडे प्रशांत वाकडे प्रामुख्याने उपस्थित होते.