सावली येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्‌घाटन-

सावली येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्‌घाटन-

182 विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी .
✒️✒️जितेंद्र बोरकर सावली प्रतिनिधी ✒️✒️

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, ग्रामीण रुग्णालय सावली मार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK 2.0) चे उद्‌घाटन कार्यक्रम सावली येथील प्राथमिक शाळा येथे दि. 1 मार्च शनीवारला पार पडला.

अध्यक्षस्थानी सावली नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ. लताताई लाकडे उपस्थीत होत्या. तर उद्‌घाटक म्हणून डॉ. हेमचंद कन्नाके, वैदयकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालयात सावली.सह उदघाटक बालविकास प्रकल्प अधिकरी तेलकापल्लीवार होते.मंचा वर प्रमुख अतिथी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी, वैदयकीय अधिकारी (RBSK) डॉ. विकास नैतूलवार, डॉ. देब्रोतोकुमार बिस्वास, डॉ. दिशा जैटवार, श्री अमरदीप पारखी (फार्मासीस्ट) श्री संजय हटवार (फार्मा सोस्ट) कु. धम्मकरुना गौतम, कु. रंजना यंपलवार (ANM) ग्रा. रु. सावली, तसेच श्री लक्ष्मण चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी अधिकारी पं. स. सावली, तसेच सर्व आंगणवाडी पर्यवेक्षीका पै. स. सावली, विजय हरमवार मु.अ. जि. प. शा. सावली कं. व सर्व शिक्षकगण उपस्थीत होते.

 

यावेळी पूणे येथील इंदीरा गांधी मॉडेल स्कूल येथील राज्यस्तरीय RBSK मेळावा व उद्‌घाटण कार्यक्रमाचे आभासी पद्‌धतीने शेट प्रक्षेपण जि.प.प्रा. शा. सावली येथे दाखविण्यात आले. सदर online उद्‌घाटन अजीत पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य हस्ते झाले.

राज्यातील जिल्हा स्तरावरील 35 तर तालुकास्तरावरील 355 शाळामध्ये हा उद्‌घाटणीय कार्यक्रम संपन्न झाला. सावली तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा सावली. येथे 182 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. विकास नेमूलवार वै. अ. (RBSK), XT. .(RBSK), ग्रा. रु. सावली यांच्या चमू मार्फत करण्यात आली. शाळा व अंगणवाडीतील 0 से 18 वर्ष क्यो-गटातील मुला मुलींची विनामूल्य आरोग्य तपासणी, जन्म जात आजार व इतर आजारावर विनामूल्य उपचार व संदर्भ सेवा, शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तसेच सावली तालुक्यातील सर्व अंगणवाडी व शाळांना सदर आरोग्य तपासणी चा दैनंदिन कृती आराखडा पाठविला आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.रवींद्र चौधरी यांनी केले तर संचालन विक्रांत रामटेके यांनी आभार मुख्याध्यापक विजय हरमवार यांनी मानले.