जिल्हाधिकारी विनय गौडा यांची मुल तालुक्याला भेट-

जिल्हाधिकारी विनय गौडा यांची मुल तालुक्याला भेट-

मुल तालुक्यातील गावांना भेटी देऊन परिसराची केली पाहाणी .

मुल – धर्मेंद्र सुत्रपवार

आज दिनांक ५ मार्च २०२५ रोज बुधवारला माननीय
जिल्हाधिकारी श्री . विनय गौडा सर यांनी मुल तालुक्यातील चिरोली येथील ब्रिज

बंधाऱ्याची पाहणी व लिफ्ट इरिगेशन ची पाहणी केली, तसेच मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम (100 खाटांचे )पाहणी केली, चिमढा येथील मानव विकास अंतर्गत गोडाऊन चे उद्घाटन केले तिथे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी वृक्षारोपणही केले, राजगड ग्रामपंचायत येथे भेट देऊन ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम व विकास कामे याबाबत माहिती घेतली. तसेच मुल तालुक्यातील गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जानुन घेतले. सदर भेटीदरम्यान माननीय उपविभागीय अधिकारी चरडे साहेब , तहसीलदार मोरे मॅडम, संवर्ग विकास अधिकारी राटोड साहेब नायब तहसिलदार कुमरे साहेब , नायब तहसिलदार ठाकरे साहेब मुल व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.