विद्यमान खासदारांचा बल्लारपुर क्षेत्राच्या विकासासाठी काय योगदान ?

विद्यमान खासदारांचा बल्लारपुर क्षेत्राच्या विकासासाठी काय योगदान ?
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांचा सवाल
मूल/तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर विघानसभा क्षेत्राचा विकास चौफेर झाला असताना देखील विद्यमान खासदारानी क्षेत्रात मागासलेपणा असल्याचा युक्तिवाद केला तो सफसेल खोटा असुन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार ,विकास पुरुष आद. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी क्षेत्रातील मूल, पोभुर्णा व बल्लारपूर तालुक्यात भरीव निधी देऊन विकास साधला आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र खासदारानी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मागासलेपणा असल्याचा जावई शोध लावला आहे. आपण खासदार म्हणुन विराजमान झाल्यावर आपण किती निधी दिला? क्षेत्राच्या विकासासाठी काय योगदान आहे? याचेही उत्तर देण्याचे आवाहन अविनाश जगताप यांनी प्रसिद्ध पत्रकातून केले आहे.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान खासदार करीत आहेत.निवडणुकीच्या वेळी आपण गावांचा विकास करू असे आवाहन मतदारांना केले होते. वर्ष उलटले मात्र विकासासाठी कुठलाही प्रयत्न करण्यात आला नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासासाठी निधी उपलब्ध करून विकास साधने आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करणे ही फार मोठी शोकांतिका असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून गावातील रस्ते, नाल्या,पुलं, शासकीय कार्यालये, बंधारे, तलावाचे खोलीकरण, सिंचन व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला.तसेच जनतेचं आरोग्य व इतर प्रश्न सोडवण्यासाठी व मुल बरोबरच बल्लारपूर व पोभुर्णा या तालुक्याचे विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून शहर विकासाला चालना देण्यात आली. त्यामुळे पूर्वीचे शहर व आताचे शहर यात तुलना केल्यास दिसुन येते. नुसत्या पाहुण्यासारख्या येऊन वाट्टेल ते बोलणे हे लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. प्रथमतः सार्वजनिक हितासाठी निधी उपलब्ध करून विकास साधा आणि तेव्हाच बोला असाही सल्ला त्यांनी दिला आहे. मागासलेपणा म्हणून आपल्याच क्षेत्रातील तालुक्यातील गावांचा अपमानजनक वक्तव्य करणे ही कृती बरोबर नाही. जिथे विकासासाठी आपले योगदान असते त्यांनी बोलले तर समजुन घेता येईल मात्र ज्यांचे विकासासाठी काही योगदान नाही त्यांनी न बोलले तरच बरे! असा टोलाही भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी लगावला आहे.