सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील वाहनांचे समोरासमोर धडक – जिवीत हानी टळली

——————————————

श्री.अनिल गुरनुले प्रतिनिधी न्यूज जागर

त्रिवेणी अर्थ मुव्हर्स कंपनीद्वारे एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पातून लोहयुक्त असलेला चुरा दगड सुरजागड येथून दररोज उचलकरण्यासाठी विविध जिल्ह्यातील व राज्यामधील अनेक ट्रान्सपोर्टचे १००० पेक्षा जास्त मोठमोठे वाहण या लोहखनिज प्रकल्पात आहे व या वाहनांने एटापल्ली ते चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावरून लोहयुक्त दगड नेने सुरु आहे दीनांक २सप्टेंबर रोजी निर्भय ट्रान्सपोर्टची १२ चाकी वाहण क्रमांक MH-34-AB-7184 ही सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज भरून आलापल्ली आष्टी या मार्गाने जात होती व पकंज जैन या ट्रान्सपोर्टची वाहण क्रमांक MH-34-BZ 5866 ही आष्टी मार्गाने सुरजागडकडे जात होती यातच पकंज जैन या ट्रान्सपोर्टच्या वाहण चालकाचे नियंत्रण सुटल्याने चामोर्शी तालुक्यातील धन्नूर फाट्यावर जवळ समोरासमोर धडक दिली या अपघातात पकंज जैन या ट्रान्सपोर्टच्या वाहण चालक गंभीर जखमी असल्याचे समजते व निर्भय ट्रान्सपोर्टचे वाहण चालक विनोद रणवीट वय (४२) हे सुखरूप आहेत .

सदर अपघात हे सकाळी ६:३०च्या दरम्यान झाले या अपघातामुळे चंद्रपूर व आलापल्ली कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली तसेच यात जास्तीत जास्त प्रमाणात सुरजागड प्रकल्पातील वाहणाच्या रांगा तिन ते चार किलो मिटर पर्यंत होत्या विशेष म्हणजे या त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीद्वारे लोहखनिज वाहतूक आलापल्ली आष्टी राष्ट्रीय मार्गाने होत असल्याने हा मार्ग खड्डेमय झाले आहे त्यातच या महामार्गावर वाहतूक करणारी अहेरी आगारातील बसेस सुद्धा बंद करण्यात आले सदर बस ही आलापल्ली मुलचेरा मार्गाने जात आहे त्यामुळे लगाम, शांतीग्राम, बोरी, खमनचेरु, राजपुर पंँच, सुभाषनगर,रामपूर,दामपूर, गिताली, कांचनपूर,या परीसरातील अनेक शाळेकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अळथळा निर्माण झाल्याने याच्या विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शीक्षणावर होत आहे तसेच लोहखनिज वाहतूक करतांना लोहयुक्त असलेला चुरा दगडचा धूळामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ यासाठी संबंधित विभागाने वाहणांनवर ताडपत्री झाकून मालाची वाहतूक करावी व क्षमतेपेक्षा जास्त माल नेऊ नये ही सर्व अटी देऊन सुद्धा सुरजागड प्रकल्पातील वाहनांकडून सदर अटीचे उल्लंघन केले जात आहे त्यातच आलापल्ली आष्टी राष्ट्रीय महामार्गावर गिट्टी पसरवून ठेवल्याने दुचाकी वाहन चालकांना दुचाकी चालवताना नाहक त्रास सहन करावे लागत आहे यामुळे या महामार्गावर बोरी येथील अनेक दुचाकी वाहन चालकांचे अपघात सुद्धा झाले आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. खरच अधिकारी व जनतेचे लोकप्रतिनिधी यांना जाग येणार का असा सवाल सुद्धा या परीसरातील त्रस्त नागरिकांनी केला आहे.