सावली तालुक्यात स्वाईन फ्लू चा रुग्ण , शहरासह परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण

श्री.निखिल दुधे सावली तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

आरोग्य विभागात खळबळ

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील एका व्यक्तीला स्वाईन प्ल्यु झाल्याचे निर्देशनास आल्यामुळे सावली शहरासह परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहीती नुसार सावली तालुक्या अंतर्गत येत असलेल्या पालेबारसा गावातील एका व्यक्तीला ताप येत होता. सदर व्यक्तीची लक्षणे/हालचाल योग्य दिसत नसल्यामुळे त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सदर व्यक्तीच्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी अहवाल मध्ये सदर व्यक्तीच्या शरीरात स्वाईन प्ल्यु चे लक्षण आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली. सदर अहवालाची माहिती सावली आरोग्य विभागाला होताच रूग्णालय परिसर व पालेबारसा गावात भितीचे वातावरणात निर्माण झाले.

या घटने नंतर सावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री औघड ( मर्लावार  ) व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांन मार्फत पालेबारसा या गावात प्रत्येक घरातील व्यक्तीच्या तपासणीचे काम सुरू केले असुन नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाला तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आव्हान केले जात आहे.