वर्धा जिल्ह्यात 264 किलो गांजासह 30 लाख रक्कम जप्त

वर्धा गुन्हे शाखेची कारवाई
न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी वर्धा

वर्धा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्तहेरा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून 264 किलो गांजासह 30 लाखाची रक्कम जप्त करण्यात यश प्राप्त झाले.
प्राप्त माहितीनुसार स्थानिय वर्धा गुन्हे शाखेला गुप्तहेरा मार्फत जिल्ह्यात चारचाकी वाहणातून अवैद्यरित्या गांज्याची तस्करी केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दितील बोरगांव ( ढोले ) फाटा, नँशनल हायवे क्र. 6 वर नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट डिझायर कार क्र. एमएच 31 सीआर 8527 हे वाहन भरधाव वेगाने येतांना दिसले. सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता कार मधिल डिक्कीतून गांजा नावाचे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले.

सदर प्रकाराबद्दल विचारणा केली असता आरोपी कडून उडउडवीचे उत्तर देण्यात येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आपला पोलिसी खाका दाखवताच आरोपी कय्यूम शहा शहन शहा (34) रा. रहेमत नगर, बोरगांव ( मंजू ) जि. अकोला, व शरद बाळू गावडे (32) रा. जुनी वस्ती पठाणपूरा चौक मूर्तिजापूर, अकोला. यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळेस पोलिसांनी आरोपी कडून स्विफ्ट डिझायर कार अंदाजे कि. 3 लाख 50 हजार रूपये, पाने, फुले, बिया मिक्स असलेली हिरव्या रंगाचे कँनाबिस वनस्पती वजन अंदाजे 264 किलो किंमत 26 लाख 53 हजार 250 रूपये, 2 मोबाईल फोन कि. 2 हजार रूपये असा अंदाजे 30 लाख 5 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पो. नि. संजय गायकवाड, स्थानिय गुन्हे शाखा वर्धा, पोलिस निरिक्षक दारासिंह राजपुत यांच्या निर्देशानुसार सहा. पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगट, पोलिस उपनिरीक्षक गिरडकर, पोलिस अमलदार प्रमोद जांभूळकर, संतोष दरगुडे, हमीद शेख, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, अवि बनसोड, संजय बोगा, मनिष कांबळे, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर, नितेश आदि पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.