श्री विलास ढोरे, तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
गोंडवाना विद्यापीठ निवडणूक २०२२
देसाईगंज: गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक २०२२ आलेल्या निकालात स्थानिक आदर्श महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. जयदेव देशमुख “वाणिज्य व व्यवस्थापन” विद्या शाखेतून विद्या परिषद सदस्य म्हणून सलग दुसऱ्यांदा पुढील पाच वर्षांसाठी निवडून आले आहेत. ते ४१५ असे भरघोस मते घेऊन विजयी झालेत.
डॉ. जयदेव देशमुख गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील वडसा-ब्रम्हपुरी परिसरातील एकमेव विजयी उमेदवार असल्याने त्यांचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान. के. जे. घोरमोडे, उपाध्यक्ष मान. जगदीशजी शर्मा, सचिव मान. मोतिलालजी कुकरेजा आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा, सर्व प्राध्यापक मंडळी कडून तसेच या परिसरात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. ते महाविद्यालयात मागील ३१ वर्षांपासून वाणिज्य शाखेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे.