श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पळसगाव (जाट) येथे समता सैनिक दलाचे दोन दिवसीय शिबीर .
सिंदेवाही :-. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ संघटना स्थापन केल्या होत्या. त्यापैकी समता सैनिक दल ही समाजाचे संरक्षण करून शिस्त लावणारी संघटना आहे. समाज गोत्यात आला आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात कार्यरत असलेले, त्यांनीच आखून दिलेल्या मार्गाने चालणारे, बाबासाहेबाना अपेक्षित असणारे, त्यांनी दिलेल्या शिस्त, व घटनेनुसार चालणारे समता सैनिक दल गावागावात निर्माण करणे ही काळाची गरज झाली असल्याचे मत भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी व्यक्त केले. ते पळसगाव (जाट) येथे आयोजित दोन दिवसीय सैनिक शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष दीपक मोटघरे, महासचिव जगदीश सेमस्कर, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा सदस्या विजयाताई रामटेके, वंचित बहुजन आघाडी सिंदेवाही तालुकाध्यक्ष मुखरू बनसोड, महेंद्र कोवले, ग्रामशाखा अध्यक्ष प्रवीण नागदेवते, इत्यादी उपस्थित होते.
समता सैनिक दल हे बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. ही एक स्वतंत्र संघटना नसून,बाबासाहेबांच्या विचारांच्या राजकीय पार्टीच्या आघाडीची फौज आहे. त्यामुळे समता सैनिक दल पुन्हा उभे करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा तालुका सिंदेवही, ग्रामशाखा पळसगाव यांचे वतीने दिनांक २४ व २५ सप्टेंबर ला बुद्ध विहाराच्या प्रांगणात दोन दिवसीय समता सैनिक दलाचे शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात परिसरातील लोनखैरी, रामाळा, वासेरा, कळमगाव गन्ना , तसेच बल्हारपुर असे एकूण ७१ तरुण तरुणानी सैनिकाचे प्रशिक्षण घेतले. याकरिता चंद्रपूर येथील समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल अशोकजी पेरकावार, मेजर प्रफुल्ल भगत, यांनी दोन दिवस सर्वांना दलाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे संचालन बी.एस. निमगडे, आभार प्रकाश तामगाडगे, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पळसगाव येथील राहुल नागदेवते, कुणाल शंभरकर, धर्मरावजी सहरे, मीराबाई खंडारे, संघमित्रा शंभरकर, महिला मंडळ अध्यक्षा किरणताई धनाविजय, रमाई महिला मंडळ, आणि समस्त बौद्ध समाजाने परिश्रम घेतले.



