गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
कुरखेडा:- चंद्रपूर क्लस्टर गडचिरोली विभाग कुरखेडा शाखा महाराष्ट्र मधील “आशा पुरस्कार सोहळा”ESAF स्मॉल फायनान्स बँक” कुरखेडा शाखेच्या वतीने “गट साधन केंद्र पंचायत समिती कुरखेडा” येथे 23, सप्टेंबर रोजी पार पडला
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तहेसिलदार सोमनाथ माळी, , तालुका आरोग्य अधिकारी मनीष रामटेके टीयूसी श्रीमती प्रेरणा राऊत, सीएच सूरज महात्मे, बीएच अतुल झा, सीएसएम अजय राणे, सीएसएम एसआय सागर जोशी” या कार्यक्रमाला सामाजिक उपक्रम विभागाची उपस्थिती होती. ESAF स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने आरोग्य विभाग कुरखेडा येथील 10 आशा वर्कर्सचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची संचालन कुरखेडा आरोग्य विभागाच्या सौ.संगिता भांडारकर यांनी केले. सर्व मान्यवरांनी बँकिंग आणि समाजाप्रती आपली सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
छाया सुकारे या आशा कार्यकर्त्यांनी कोविड 19 काळापासून कठोर परिश्रम करत आहेत. हा उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी मनीष रामटेके यांच्या सहकार्याने केला असून त्यामध्ये कठोर परिश्रम केल्याबद्दल प्राथमिक स्तरावरील आरोग्य वी कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला तर सहविद कालावधी 100% लसीकरण 120 आरोग्य कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते आभार सौ.योगिता पंधरे यांनी मानले.