शिवाजी महाराजांची फोटो लावण्यात न.प. ला विसर-चंदू वडपल्लीवार यांचा आरोप

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

आरमोरी:- स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव निमित्ताने आरमोरी ब्रम्हपुरी या राष्ट्रीय महामार्गावर स्ट्रीट लाईट च्या खांब्यावर सर्व महापुरुष च्या फोटो लावण्यात आले आहे, मात्र त्यामध्ये महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावण्यात नगर परिषद आरमोरी यांना विसर पडला असून तात्काळ शिवाजी महाराज यांची फोटो लावावे अशी मागनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष चंदू वडपल्लीवार यांनी केली आहे.

केंद्र सरकारने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यालेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव या वर्षी साजरा करण्यात आला त्यात नगर परिषद आरमोरी ने शहरात अनेक ठिकाणी वॉल पेंटिंग, स्वच्छता मोहीम, जनजागृती, वृक्ष लागवड आदी मोहीम राबविण्यात आली मात्र त्या सोबत आरमोरी कडून ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या अरसोडा फाट्याजवळील स्ट्रीट लाईट खांब्यावर यामध्ये अनेक थोर महापुरुष व माजी राष्ट्रपती, माजी सैनिक, आदी चे डिजिटल लाईट फोटो लावण्यात आले आहे, मात्र मुघलां पासून स्वतंत्र ठेवणाऱ्या आपल्या मराठी माणसाला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो नगर परिषद ने डावल्याने आली असल्याने आरमोरी शहरातील नागरिकांना मध्ये असंतोष पसरला असून या बाबद चंदू वडपल्लीवार यांनी नगर परिषद च्या लक्ष्यात आणून दिल्यावरही न.प. हेतु परस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप वडपल्लीवार यांनी केला असून आपल्याच दैवत महाराज बद्दल वावडे का असा प्रश्न विचारण्यात आला आहे.हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपून घेणार नाही तरी तात्काळ नगर परिषद ने शिवाजी महाराज यांची फोटो लावण्यात या वी अशी मागणी करण्यात केली आहे.