आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांचे केले अभिनंदन !

 

. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांचे केले अभिनंदन !

यशस्‍वी कार्यकाळासाठी दिल्‍या शुभेच्‍छा !

ऑगस्‍ट महिन्‍यात विधानसभा अध्‍यक्ष येणार चंद्रपूर दौ-यावर.

 

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानभेचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांची भेट घेत त्‍यांचे अभिनंदन केले व यशस्‍वी कार्यकाळासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी बांबुपासून तयार करण्‍यात आलेला तिरंगा ध्‍वज  भेट देत आ. मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्षांचे स्‍वागत केले.

 

न्‍यायप्रियता हे विधानसभा अध्‍यक्षपदाचे शक्‍तीस्‍थळ आहे. हे शक्‍तीस्‍थळ जपत रामशास्‍त्री प्रभुणे यांचा आदर्श बाळगावा अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली. विधानसभेच्‍या सार्वभौम व पवित्र सभागृहाच्‍या माध्‍यमातुन महाराष्‍ट्रातील सर्वच घटकांना न्‍याय मिळेल, उपेक्षित, वंचितांच्‍या आयुष्‍यात समृध्‍दीचा प्रकाश निर्माण होईल अशा पध्‍दतीचे सत्‍कार्य आपल्‍या हातुन घडावे असेही आ. मुनगंटीवार शुभेच्‍छा देताना म्‍हणाले. ऑगस्‍ट महिन्‍यात आपण चंद्रपूर दौ-यावर यावे असे निमंत्रण आ. मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्‍यक्षांना दिले. अॅड. राहूल नार्व्‍हेकर यांनी आ. मुनगंटीवार यांचे निमंत्रण स्विकारत ऑगस्‍ट महिन्‍यात चंद्रपूर दौ-यावर येण्‍याचे मान्‍य केले.