श्री.विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज:- “मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा असते. मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे ती सुद्धा आपल्या हृदयाची भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.” असे मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर यांनी केले. ते वाङ्मय विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या उद्घाटनीय कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा रमेश धोटे, उद्घाटक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. हितेंद्र धोटे, अतिथी मान. बबनराव वडेट्टीवार, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, प्रा. सुभाष मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी या मंडळांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांचा पुरेपुर उपयोग घ्यावा, आयोजित होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्यातील सुप्त कलागुणांचा विकास करून घ्यावा,” असे अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा. रमेश धोटे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उद्घाटक डॉ. हितेंद्र धोटे, प्रमुख अतिथी प्रा. सुभाष मेश्राम यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदिप ढोरे, संचालन प्रा. जयंतकुमार रामटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. शिवानी देसाई या विद्यार्थीनीने मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.