कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमात जेष्टाचा सत्कार

चामोर्शी तालुका प्रतिनिधी 
गानली समाज चामोर्शीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन
चामोर्शी:- येथील गाणली समाजाच्या वतीने -09 आक्तोंबर रोजी डिज्नीलैंड इंग्लिश मिडीयम शाळेत कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शहरातील महीला पुरुष दोन जेष्ठ नागरिकाचा सत्कार करण्यात आला
कोजागिरी पोर्णिमा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपभाऊ पोटवार,प्रमुख अतिथी म्हणून रवीभाऊ येणप्रेड्डीवार, मनोजभाऊ मुनगेलवार व सत्कारमूर्ती म्हणून समाजातील जेष्ठ नागरिक .बबन वड्डेटीवार व महीलामधून श्रीमती उषाताई संतोषवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मी पूजनाने झाली. समाजातील ज्येष्ठ नागरिक बबन वड्डेटीवार व उषाताई संतोषवार यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल_ श्रीफळ_ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष .दिलीपभाऊ पोटवार यांनी कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व समाज बांधवांना एकत्र करून समाजाला संघटित करण्यासाठी व एकमेकाची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले.तसेच चामोर्शी तालुक्यात बहुसंख्य समाज बांधव राहत असून सर्वांच्या सोयीसाठी,सर्व समाज बांधवाने एकत्रित सहकार्यातून समाज भवनाची निर्मिती करावी असी इच्छा व्यक्त केली.
सत्कारमूर्ती तथा सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा असलेले सत्कार मूर्ती बबन वड्डेटीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाप्रसंगी_सुख:दुःखाच्या क्षणी सर्व समाजबाधवांनि एकत्रित येने गरजेचे आहे व दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाची परंपरा चालत राहिली पाहिजे. अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी .प्रा. दिलीपराव टेप्पलवार यांनी आपल्या प्रास्ताविकेतव कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व विशद करताना सांगितले की या दिवशी लक्ष्मी देवता आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते असे मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथन केल्यावर देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यामुळेच या दिवशी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ.नम्रता बोमनवार हिने केले.
लक्ष्मीपूजन व मान्यवरांच्या मनोगतानंतर सर्व वयोगातील मुलांसाठी विविध फ्रॉग जंप हीस्पर्धा घेण्यात आली. सर्व मुलांनी या स्पर्धेत उस्फुर्तेने भाग घेतला. सदर कार्यक्रमाच्या नियोजनात विविध स्पर्धा, कपल्स Game,किड्स Game चे नियोजन करण्यात आले , होते सदर कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व समाज बांधवांनी स्नेहभोजन केले.त्यानंतर सर्वांनी अमृततुल्य दुधाचे प्राशन केले. कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयोजक प्रमुख बबन वड्डेटीवार,. दिलीपराव. टेप्पलवार ,.घनश्याम मनबत्तुलवार, .नितीन चन्नावार, अमित संगीडवार,प्रवीण चन्नावार, रामभाऊ पोटवर,प्रतिक पुण्यप्रेड्डीवार, प्रवीण चन्नावार आणि ज्यांच्या कल्पकतेने कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी झाला ते सौ.नेत्राताई वड्डेटीवार,सौ.छायाताई बोमनवार,सौ.पिंकीताई बोमनवार,सौ.नम्रताताई बोमनवार,सौ.नेहाताई पुनप्रेड्डीवार,सौ.वर्षाताई टेपल्लवा,सौ.प्रीतिताई पोटवार,सौ.पूजाताई व स्नेहाताई चन्नावार व सर्व समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाला पावसाचे व्यत्यय आले तरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते