आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून हळदा येथील अपघातग्रस्त युवकाला आर्थिक मदत

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील रहिवासी स्वप्नील वाघरे (वय २५ वर्ष) हा दुचाकीने ब्रम्हपुरी वरून आपले काही खाजगी काम आटोपून परत आपल्या गावाकडे जात असतांना ब्रम्हपुरी-आरमोरी रस्त्यावरील रणमोचन फाट्याजवळ मागेहुन चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये त्याच्या पायाला गंभीररित्या दुखापत झाली. प्रसंगी उपचारादरम्यान त्याचा एक पाय तोडावा लागला. आता त्याला कृत्रीम पाय बसवायचा आहे. परंतु घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सदरची माहिती हळदा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर युवकाला कृत्रीम पाय बसवण्यासाठी थोडा आर्थिक हातभार लागावा या हेतूने त्यांनी आपल्याकडून सदर युवकाला आर्थिक मदत दिली.

सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार, अमोल सलामे, सुरेश वंजारी यांची यावेळी उपस्थिती होती.