श्री श्याम यादव, कोरची प्रतिनिधी ,न्यूज जागर
बेतकाठी तालुका कोरची येथील टिप्पर ट्रॅक्टरने गिट्टी खदान मालवाहतूक करण्याच्या कामाकरिता 15000 ची लाच रक्कम स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अटकला आहे. नरेंद्र रामचंद्र ठाकरे वय 44 वर्ष असे लाचखोर तलाठ्यांचे नाव असून सदर कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदारास आरोपी नरेंद्र रामचंद ठाकरे यांनी १० ऑक्टोबर 2022 रोजी सोडलेल्या टिप्पर चे दहा हजार रुपये व टिप्पर/ ट्रॅक्टरने कार्यक्षेत्रातून गिट्टी खदान माल वाहतूक करण्याच्या कामाकरिता मासिक दहा हजार रुपये असे एकूण 20000 रुपये लाच रकमेची पंचसाक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केली. तक्रारीची शहानिशा करून सापडा रचला असता १५००० हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठी कार्यालय बेतकाठी येथे रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलीस स्टेशन कोरची येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाच रुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली पोणी शिवाजी राठोड, पोनी श्रीधर भोसले, पो. ना. राजेश अमलदार , पदमगीरवार, पो.ना.श्रीनिवास संगोजि, पोशि.संदीप उडान, पोशि.संदीप घरमोडे ,चापोहवा.तुळशीराम नावघरे यांनी केली.