चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे यांच्या नेतृत्वात भाजपाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन
सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या गरोदर मातांना यांच्या अनुपस्थितीमुळे नाहक त्रास होत असल्याची तक्रार
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी तज्ञ (रेडिओलॉजिस्ट) सतत गैरहजर राहत असल्याने चामोर्शी तालुक्यातून सोनोग्राफी साठी येणाऱ्या गरोदर मातांना नेहमीच तपासणी न करता परत जावे लागते त्यामुळे अशा सतत गैरहजर राहणाऱ्या सोनोग्राफी तज्ञावर कारवाई करावी अशा अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री साईनाथ जी बुरांडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे
सतत गैरहजर राहणाऱ्या या रेडिओलॉजिस्ट वर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने आमदार महोदयांना केली. याबाबत आपण पाठपुरावा करून कारवाई बाबतची मागणी प्रशासनाकडे करू असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी निवेदन देताना भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ चलाख, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, महामंत्री विनोदजी गौरकार, जयरामजी चलाख, लोमेश सातपुते, दीपक वासेकर यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.