जि.प.शाळा बंद झाल्यास,गाववाशीय आंदोलानाच्या पविञ्यात

लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या इमारती होणार बेवारस.

नागभीड (तालुका प्रती) राज्यातील जिल्हा परिषद च्या शाळेतील पट संख्या २०पेक्षा कमी असल्यास त्या बंद करण्याचा निर्णय राज्य शासन घेण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात येणार आहे. त्यासाठी गाववाशीय आक्रमक होऊन आंदोलनाच्या पविञ्यात आहेत.जिल्हा परिषदने नागभीड तालुक्यातीत निर्लेखित शाळांचे सन २०२१-२२ यावर्षी लाखो रुपये खर्च करुन नविन इमारती बांधल्या आहेत. पण शाळा बंद झाल्यास त्या इमारती बेवारस स्थितीत आढळून येतील. तालुक्यात जिल्हा परिषद च्या निधीतुन इरव्हा (टेकरी), रेंगातुर,सुलेझरी या गावात शाळे साठी नविन इमारत उभारण्यात आल्या आहेत. नागभीड तालुक्यात पट संख्येत कमी असणाऱ्या जि.प. शाळा नवानगर (८),उर्दु स्कुल नागभीड (९) ,सारंगगड (१०) पारडी जाटील(११) घोडाझरी (११) सुलेझरी(१२) तिव्हर्ला(१२) सोनापुर तुकुम(१२) आवळगाव(१२) खरबी(१४) रेंगातुर(१५) सोनुली खुर्द(१६) कोदेपार(१०) राजुली(१७) धामणगाव माल(१८) टेकरी(१८) आलेवाही(१८) चारगाव माना(१८) लखमापुर(२०) या शाळेंचा समावेश आहे. जर राज्य शासनाने या शाळांचे इतर शाळेत समायोजन केल्यास विद्यार्थ्यांना जाण्या-येणास खुप मोठी अडचन निर्माण होईल,व त्यांच्या शिक्षणात पोकळी निर्माण होईल. नागभीड नगरपरिषद मध्ये येत असलेली सुलेझरी येथिल जि.प.च्या शाळे मध्ये जवळ असलेल्या खैरी(चक) येथिल गावातील मुले पायदळ शिकण्यासाठी येत आहे. त्यांना ही शाळा बंद झाल्यास नागभीड शिवाय त्यांना पर्याय उरणार नाही.पालकांना याचा खुप मोठ्या प्रमाणात ञास होणार? त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन जि.प.कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार करु नये.तर शाळा बंद केल्यास गाववाशीय आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य शासनाने ग्रामीण भागातील कमी पटसंख्याअसलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करु नये,गाव सोडुन विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावाला जाने शिक्षणासाठी सोयीचे होणार नाही,उलट त्यांना ञासदायक होईल.त्याबरोबर त्यांच्या पालकांना त्यांना दररोज दुसऱ्या गावातील शाळेत सोडुन देण्यास परवडणार नाही.- प्रमोद चौधरी, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी नागभीड