देसाईगंज नगर परिषदेतर्फे 5 टक्के राखीव निधी अंतर्गत दिव्यांगांना धनादेश वितरण

-: प्रेस नोट :-

श्री विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांकरीता दरवर्षी नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येत असते व सदर निधी दरवर्षी अर्धवार्षीक स्वरुपात दिव्यांग बांधवांना वितरीत करण्यात येत असते. सन 2022-23 या आर्थीक वर्षा नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवांकरीता 5 टक्के निधी रुपये 468100/- राखुन ठेवण्यात आलेली असुन या निधीअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकिय खर्च व उदरनिर्वाहाकरीता माहे -एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीचा अर्धवार्षीक हप्त्याचे निधी वितरण आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आ.कृष्णाजी गजबे यांचे हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात धनादेशाचे वितरण करण्यात आले. सदरचे निधी 167 लाभार्थींना त्यांचे थेट बँक खात्यात आरटीजीस /नेफ्ट द्वारे वितरीत करण्यात येत आहे.

यानंतर सुध्दा अर्ज दिव्यांग बांधवांचे स्विकृती करण्यात येतील तरी पात्र दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी केले .

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद देसाईगंज चे माजी माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा,नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक महेश गेडाम, पाणीपुरवठा अभियंता आशिष गेडाम ई.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे यांनी केले. तसेच या कार्यक्रमांकरीता नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.