श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
ग्रामपंचायत उश्राळा मेंढा तर्फे नागभीडच्या तहसीलदारांना निवेदन.
नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायत उश्राळा (मेंढा), गंगासागर हेटी, आकापूर या गावातील लोकांनी ई- पीक पाहणी ऑनलाईन करून सुद्धा त्यांचे सात-बारावर नोंद येत नसल्यामुळे शेतकर्यांना भविष्यात त्रास सहन करावा लागेल व सोसायटीमध्ये धान विक्री व इतर कोणत्याही कामासाठी, सातबारावर ई पिक पाहणणीची होऊन नोंद होत नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात व हे नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे. व या समस्येचे निराकरण करण्यात यावे. याकरिता तहसीलदार नागभीड यांना ग्रामपंचायत उश्राळा मेंढा तर्फे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन उश्राळा मेंढा येथील लोकनियुक्त सरपंच हेमंत लांजेवार यांनी नागभीड चे तहसीलदार यांना दिले.