शहरातील बंद पडलेल्या घंटागाड्या यथाशिघ्र सुरु करण्यात याव्यात- युवक कॉंग्रेसची मागणी

श्री विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

स्वच्छता अभियानात मानांकन मिळवलेल्या नगर परिषदेणे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी शहरवाशियांच्या घरातुन कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरु केल्या.माञ मागील १० दिवसांपासून घंटागाड्या बंद करण्यात आल्याने टाकाऊ कचरा कुठेही टाकल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागल्याचे पाहु जाता सदर घंटागाड्या यथाशिघ्र सुरु करण्यात याव्यात,अन्यथा विरोधात कार्यालया समोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज नगर परिषदेला स्वच्छता अभियानाचे मानांकन मिळाले आहे.शहरात कुठेही टाकाऊ कचरा टाकल्या जाऊ नये यास्तव एका खाजगी कंञाटदाराला १ कोटी ७ लाख रुपयाचा ६ महिण्याकरीता शहरवाशियांच्या घरापर्यंत घंटागाड्या नेऊन कचरा उचलण्याचा कंञाट देण्यात आला आहे.माञ सदर कंञाटदार हा बाहेरचा असल्याने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहीमेचे तीनतेरा वाजले असले तरी प्रशासकीय यंञणेकडुन कुठलिच कारवाई करण्यात येत नसल्याने संबंधित कंञाटदाराची मनमानी सुरु आहे.

मागील १० दिवसांपासून शहरात घंटागाड्या फिरवणेच बंद करण्यात आल्याने येथील नागरीक,ओला व सुका कचरा कुठेही टाकत असल्याने स्वच्छता अभियानाला पुरते ग्रहण लागल्याने शहरात घाणिचे साम्राज्य पसरु लागले आहे.जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरु लागली असुन यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता शहरात सुरु असलेल्या घंटागाड्या यथाशिघ्र पुर्ववत सुरु करण्यात येऊन कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यात यावी, अन्यथा विरोधात नगर परिषद कार्यालया समोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.निवेदन मुख्याधिकारी यांनी स्विकारले असुन समस्या तत्काळ मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

यावेळी देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पिंकु बावणे,तालुका युवक काँग्रेस महासचिव पंकज चहांदे,जेष्ठ नेते नरेंद्र गजपुरे, अनुसूचित जाती महिला काँग्रेस तालुका सचिव समिता नंदेश्वर,नरेश लिंगायत,सुनील चिंचोळकर, युवराज उईके, घनश्याम कोकोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.