शेडमाके विद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली . याप्रसंगी प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्व पटवून देण्यासाठी सामान्य ज्ञान, बोधपर गोष्टी व अभ्यासक्रमाची पुस्तके देऊन वाचन करण्यात आले .यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार, प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश निमकर, सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरुनुले ,नरेंद्र चिटमलवार , सुरेश केळझरकर, अनिल निमजे, अभिषेक ढोंगे, गजानन बारसागडे, चंदू सातपुते , रुचिता बंडावर, निशा रामगुंडे अभिषेक ढोंगे, लिलाधर दुधबळे, तिरुपती बैरवार, रतन सिकदर , सुरज मुनगेलवार आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक प्रकाश निमकर यांनी तर प्रास्ताविक अभिषेक ढोंगे मार्गदर्शन प्राचार्य अनिल गांगरे डी आर तर आभार प्रदर्शन गजानन बारसागडे यांनी मानले यासाठी यशस्वीतेसाठी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले