गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
शिक्षण विभागाने 0 ते 20 पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण जाहीर केले.त्यानंतर शिक्षक भारतीच्या वतीने शासनाच्या शाळा बंद च्या निर्णया विरोधात ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीकडून ठराव घेण्याची मोहीम सुरू केली आहे. आरमोरी तालुक्यातील नरोटीमाल येथील जिल्हा परिषद ची शाळा बंद करू नये असा ठराव पारित केला.पालक व गावकऱ्यांनी आपल्या गावातील शाळा बंद करू देणार नाही,असा निर्धार व्यक्त केला.
शासनाच्या शाळा बंद करण्याच्या विरोधात आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनात व शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक भारती राज्यध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख यांच्या उपस्थितीत नरोटीमाल येथिल शाळा व्यवस्थापन समिती तर्फे शाळा बंद करू नये असा ठराव संमत करण्यात आला. शाळा व्यवस्थापन, पालक व मुख्याध्यापक यांना पुंडलिक देशमुख यांनी शासनाच्या धोरणाविषयी माहिती दिली.
या शाळेत दोन शिक्षक असून 1 ते 4 चे 20 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी शाळा वाचवा शिक्षण वाचवा, देश वाचवा अश्या घोषणा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री किरण मडावी, वंदनाताई कुमरे ग्रा प सदस्या, श्री अशोक देशमुख, श्री रामकृष्ण मडावी, श्री शिशुपाल जुमनाके, सौ निराशा मडावी, श्री बाळकृष्ण वरखेडे, श्री लालाजी गेडाम, सौ जिजा मडावी, राजू मडावी, विनोद मडावी, प्रमोद मडावी, श्री मधुकर गडपायले ,सौ वैष्णवी गेडाम, मुख्याध्यापक श्री के टी उसेंडी, सहाय्यक शिक्षक श्री अशोक तागडे उपस्थित होते