श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
राजुरा तालुका केळझर गावातील दुर्दैवी घटना
येतील विरूर स्टेशन परिसरात येत असलेल्या केळझर गावातील एका शेतमजुराने नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मराव बाजीराव पेंदोर वय ३५ वर्ष असे त्या शेतमजुराचे नाव आहे.
धर्मराव पेंदोर यांच्या कडे वडिलोपार्जित शेती नसल्याने त्यांनी लग्नानंतर सासऱ्याने दिलेल्या तीन एकर शेतीवर उदरनिर्वाह करीत होता.पण सततच्या नापिकीने तो त्रस्त होता.नुकत्याच पडलेल्या पावसामुळे शेती पाण्याखाली आली होती.पिके जमीनदोस्त झाल्याने जगायचे कसे या विवंचनेत होता.त्यातच शेतीसाठी बँकेकडून दीड लाखाचे कर्ज घेतले होते.हे कर्ज फेडायचे कसे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता.अखेर या नापिकीला कंटाळून त्यांनी घरात असलेले कीटकनाशक औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.त्यानंतर लगेच त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मल्लेश नर्गेवार करीत आहे.