श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
सेवाव्रत बहुउद्देशिय संस्था ही सामाजिक संस्था असुन या संस्थेव्दारे गरजू,अनाथ, विकलांग,निरश्रित,मतिमंद, वृध्द यांच्या समस्येचे निवारण करून आश्रय दिला जातो. तसेच कायदेविषयक समुपदेशन केल्या जातो. संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा कु. सिमाताई अशोक राऊत पाटील यांच्या माध्यमातून आणी कल्पनेतून नवोदित कविंना व्यासपीठ व जेष्ठांचा सन्मान करता याव म्हणून या संस्थेव्दारे माईकट्टा महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली. तसेच कु.सिमाताई यांनी आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेच आपणास काहीतरी देण लागत,शाळेविषयी असलेलं प्रेम,विद्यालयातील संस्काराची आठवण समजून कर्मवीर विद्यालय नागभीड येथील दोन अनाथ विद्यार्थी कु.प्रतिक्षा गुरूदेव देव्हारी वर्ग ७ आणि कु. प्रणय मंगेश मांढरे वर्ग ८ यांच वर्ग १२ वी पर्यंत शैक्षणिक पालकत्त्व कु सिमाच्या माध्यमातून सेवाव्रत संस्थेने स्वीकारलं आहे.सेवाव्रत बहू. स़ंस्थेनी सत्र २०२२-२३ यावर्षी ५ मुलांच शैक्षणिक पालकत्त्व स्विकारलेल आहे.विद्यार्थाना शेक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थांना जो वार्षिक खर्च येतो तो चेक स्वरूपात कार्यक्रमाप्रसंगी वितरीत करण्यात आला.. कु.सिमाताई अ.राऊत पाटील यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करता़ंना आज जशी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत म्हणून काही देण्याचं भाग्य लाभल तसचं भविष्यात पण अनेक गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली व तशी ग्वाही दिली.याप्रसंगी विद्यालयाचे प्रा.चिलबुले ,पर्यवेक्षक.ईडपाचे,मुनघाटे,दिघोरे,सौ. गिरडे, कु. चिलबुले,कायरकर व शिक्षकवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.कु सिमाताई यांच्या सेवाव्रत संस्थेच्या वतीने शैक्षणिक पालकत्त्व घेण्याकरीता डाॅ.राहुल मोहरे,सतिश नेरालवार,सचिव गुलाब राऊत पाटील,जयश्रीताई नेरालवार, अभियंता तुषार निनावे,मालाताई सुटे, पोलिस अ.अनिता गजरे,पुनम कापकर मॅडम, डाॅ.जयश्री आखाडे-बुट्टे,श्रीमती शिलाताई बोपटे,उज्ज्वला राऊत पाटील, दाते, सर्व सन्मा.गण सेवाव्रत संस्थेसोबत असून त्यांच सदैव सहकार्य मिळते. छोटेखाणी स्वरूपात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे संचालन श्री स्वप्निल् नवघडे यांनी केले.विद्यालयाच्या वतीने सेवाव्रत संस्थेला व त्यांच्या कार्याचे स्वागत केले आहे.