श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
बहुजन समाज पार्टीचे आयोजन
बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तनदिन ,विजया दशमी व ईद -ए -मिलाद पर्वावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , बहुजन नायक कांशीराम स्मृतीदिन व डा .अब्दुल कलाम जयंतीनिमित्य सम्राट अशोक ,तुकडोजी महाराज ,डा .बाबासाहेब आंबेडकर ,बहुजन नायक कांशीराम व डा .अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातिल विविध शाळा महाविद्यालयमधील इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय महापुरुष सामान्यज्ञान परीक्षेत खातगावचा पियुष बौद्धप्रकाश चहांदे ,सिंदेवाहीचा अमर एकनाथ कुमरे व पेटगावची प्रतीक्षा भाऊराव धारणे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत .तर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणुन सिंदेवाहीचा सम्यक मिलिंद गेडाम व वासेराची स्नेहल भगवान मेश्राम यांना जाहीर करण्यात आले आहेत .विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने रोख पुरस्कार ,भेटवस्तु व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत .
या परीक्षेत तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालय मधील एकंदरीत अडीचशे विदयार्थी सहभागी झाले होते .या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी प्रा .भारत मेश्राम ,नंदू खोब्रागडे , आम्रपालीताई मेश्राम ,इंजि .अनिकेत रामटेके ,शिल्पा कोवे ,घुमेश पुसनाके ,करिष्मा दांडेकर ,साक्षी मडावी सहित बामसेफ , बहूजन समाज पार्टी , बहुजन विद्यार्थी फेडरेशन ,शिवाजी बिरसा आंबेडकर युवा ब्रिगेड ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व मायावती फेन्स क्लब सिंदेवाहीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .